23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

खाजगी रुग्णालयांबरोबर केलेला करार रद्द करा

नगरविकास विभागाचे पनवेेल पालिकेला निर्देश

पनवेेल : कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासाठी पनवेल महापालिकेने खासगी रुग्णालयांबरोबर केलेला करार तातडीने रद्द करण्यात यावा व सर्व कोरोनाबाधित रूग्णांवर महात्मा फूले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णसेवा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला दिले आहेत. महात्मा फूले जन आरोग्य योजना ही सर्वांसाठी लागू करण्यात आली असून या योजनेच्या अंतर्गत विविध रुग्णालये संलग्न आहेत. त्यामुळे महापालिकेने आपल्या स्थरावर या योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयाशी करार करण्याची आवश्यकता नसल्याने नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालय आणि नेरूळ येथील डी. वाय. पाटील रूग्णालय, यांच्यासोबत केलेला करार रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोनाबाधितांवर उपायोजना करण्यासाठी पनवेल महापालिकेतर्फे एमजीएम हॉस्पिटल कामोठे व डी.वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ या खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी दरमहा किमान दीड कोटी रूपये प्रत्येकी दोन्ही रूग्णालयांवर खर्च करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. स्थायी समितीच्या बैठकीमध्येही त्यांनी यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. महात्मा फूले जन आरोग्य योजना दोन्ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध असून सुद्धा त्यामधून खर्च न करता खाजगीरित्या सदर खर्च करण्यात येत आहे. यामध्ये जनतेच्या पैशाची उधळण होत असल्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी अरविंद म्हात्रे यांनी केली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा अधिगृहीत करुन विहित दराने उपचार करणे अनिवार्य आहे. साधारणपणे कोविडमध्ये 80 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असणारी असतात. अशा रुग्णांना कोविड सुविधा केंद्र किंवा घरामध्ये क्वारन्टाईन करून गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांना मुबलक प्रमाणात खाटा व इतर सुविधा उपलब्ध होऊ शकतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत विविध रुग्णालय संलग्न असून कोणत्याही महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयाशी वेगळयाने करार करण्याची आवश्यकता नाही. तसेच अशा प्रकारच्या करारामध्ये रुग्णालयाच्या देखभालीचा तत्सम खर्च आकारला जात असतो. त्यामुळे रुग्णांवर होणार्‍या खर्चाची द्विरुक्ती होते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे व डी.वाय. पाटील रुग्णालय, नवी मुंबई यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा, असे पत्र नगरविकास विभागाने पनवेेल महापालिकेला दिले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट